पुणे : पुणे पोलिसांनी चालु वर्षात मोक्का कारवाईची शतकी खेळी केली आहे. 100 गुन्ह्यांच्या अतंर्गत 670 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये खुनाच्या गुन्ह्यात 92 जणांवर तर खुनाच्या प्रयत्नात 353 जणांवर तसेच खंडणीच्या गुन्हयात 68 कारवाई करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी लोन अप फसवणूक करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाईचे शतक पूर्ण केले असून चालु वर्षात 37 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
या टोळीतील मुख्य आरोपीचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. टोळी प्रमुख धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. सोलापुर (टोळी प्रमुख), स्वप्नील हनुमत नागटिळक ( वय 29, रा. विजापुर रोड, सोलापुर) , श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (वय 26, रा त्रिवेणीनगर भेकराईनगर फुरसुंगी हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (वय 43, रा. मुमताजनगर कुमठेनाका, सोलापुर, सॅम्युअल संपत कुमार (वय 40 , डिकोजा रोड बेलातुर बंगलोर, कर्नाटक ), सय्यद अकिब पाशा ( वय 23, वर्षे रा. बेंगलोर, कर्नाटक ), मुबारक अफरोज बेग ( वय 22, रा.बेंगलोर, कर्नाटक), मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम ( वय 42, रा. कोझीकोड अरुर केरळ ), मोहम्मद मनियत पिता मोहिदु (वय 32, रा. पडघरा, केरळ) अशी “मोक्का” नुसार कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार झोन एक मध्ये 7 गुन्ह्यात 48 जणांवर, झोन 2 मध्ये 20 गुन्ह्यात 135, झोन तिन मधील 16 गुन्ह्यात 110 जणांवर, झोन 4 मध्ये 19 गुन्ह्यात 134 जणांवर, झोन पाचमध्ये 22 गुन्ह्यात 150 जणांवर तर गुन्हे शाखा अंतर्गत 16 गुन्ह्यात 93 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.