पोलीस आयुक्तांना विचारले शहरातील वाहतूकीच्या समस्यांबाबत सर्वाधिक प्रश्न
इतर देशातील पोलीस तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्याचा मानस : विनयकुमार चौबे
पिंपरी : पिंपरी–चिंचवड शहरातील समस्या आणि पोलीस खात्याशी निगडीत असणाऱ्या नागरिकांच्यासमस्या आज स्वतः पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ट्विटरद्वारे समजून घेतल्या. यावेळीशहरातील वाहतुकीच्या समस्येवर जास्तीचे प्रश्न विचारण्यात आले. याचबरोबर गुन्हेगारी आणि अन्यविविध विषयांवर प्रश्न विचारले गेले.
विदेशातील पोलिसांकडून कोणती गोष्ट शिकून ती शहरात लागू करण्यासारखी आहे, असा प्रश्न अमित आवारे यांनी उपस्थित केला. याप्रश्नाचे आयुक्तांनी कौतुक केले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी उत्तर देताना म्हटले कि, मी नेदरलँड येथील भारतीयदूतावासात काम करत असताना तिथे होणारा तंत्रज्ञानाचा वापर अतिशय प्रभावी वाटला. तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे पिंपरी चिंचवडशहरात करण्याचा मानस आहे.”
पुणे–नाशिक महामार्गावर पांजरपोळ येथे अनेक वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवतात. यात चारचाकी आणि स्कूल बस देखीलअसतात, असे श्रीकांत यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांनी उत्तर दिले. पांजरपोळ येथे नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्यासूचना देण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसात तीन हजार वाहन चालकांवर विरुद्ध दिशेने वाहने चालविल्या बाबत कारवाईकरण्यात आली आहे.
वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंजवडी वाहतूक विभाग पूर्णतः अपयशी ठरला असल्याची तक्रार राकेश यांनी केली. त्यावर हिंजवडीपरिसरात अनेक संस्था संयुक्तपणे काम करत आहेत. त्यांच्या सोबत पोलीस देखील सर्वसमावेशकपणे काम करत असल्याचेआयुक्तांनी सांगितले. याचबरोबर योगेश जोशी यांनी हिंजवडी आयटी पार्क मध्ये पीक अवर्स मध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदकरण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी वाहतूक विभागाला दिल्या आहेत.
वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती केली जावी, अशी मागणी सोलो ट्रॅव्हलर या ट्विटर खातेधारकाने केली. सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती केली जात असून त्याबाबतचे व्हिडीओ ट्विटरवर देखील पोस्ट केले जातील, असेआयुक्तांनी सांगितले.
चाकण मधील वाहतूक सुरळीत होत आहे. त्याबद्दल सुनील भोंग यांनी कौतुक केले. याचे श्रेय पोलीस आयुक्तांनी चाकण वाहतूकविभागाचे सहायक पोलीस निरीक्षक मछिंद्र आदलिंग यांना दिले. तसेच फीडबॅकसाठी सुनील भोंग यांचे आभार मानले.
पोलिसांचा दंडात्मक कारवाईवर अधिक भर आहे. त्याबाबत काहीतरी करा, अशी सूचना संदीप शिंदे यांनी केली. त्यावर पोलीसआयुक्तांनी, “नियमभंग करणाऱ्यांना दंड… आणि वाहतूक नियमनासाठी कटिबद्ध…!!” अशी प्रतिक्रिया दिली.
मोठा आवाज करणारे सायलेन्सर जसे जप्त करता, तसेच फॅन्सी नंबर प्लेट देखील जप्त करण्याची मागणी श्रीकांत चव्हाण यांनी केली. त्यावर पोलीस आयुक्तांनी फोटो पोस्ट करत फॅन्सी नंबर प्लेट देखील जप्त करत असल्याचे सांगितले.
प्रतीक नाईक यांनी प्रत्येक आठवड्याला नागरिकांशी संवाद साधण्याची विनंती केली. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कल्पना आणि प्रश्नपोलिसांपुढे मांडता येतील, असे नाईक यांनी म्हटले. त्यावर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या ट्विटर आणि पिंपरी–चिंचवड पोलीस नियंत्रणकक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
बुलेटचे फटाके फोडत जाणाऱ्यांवर कारवाई करा. विशेषतः जे रात्री 10 नंतर फोडतात. त्यांना तर चांगलाच प्रसाद द्या, असे एन के यांनीसांगितले. आयुक्त म्हणाले, “कारवाई जोरात चालू आहे. प्रसाद नाही पण चालान दिले जात आहे. या वर्षी 350 पेक्षा अधिक जणांवरकारवाई करुन सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.”
संदीप भामरे यांनी बॅचलर शेजाऱ्यांचा त्रास होत असेल तर कायद्यात काही तरतूद आहे का, असे विचारले. त्यावर आयुक्तांनी केवळ112 क्रमांकवर संपर्क करण्याची विनंती केली.
निलेश बोराटे यांनी दोन पानांवर प्रश्न टाईप करून ते पोलीस आयुक्तांना ट्विट केले. त्यात शहरातील पोलिसिंगशी संबंधित एकही प्रश्ननव्हता. ताऱ्यांची निर्मिती कशी होते. डोंगरावर उगवणाऱ्या गवताचे आयुष्य किती असते, अशा प्रकारचे प्रश्न होते.
तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न नासा, एलन मस्क अथवा चॅट जीपीटी कडे विचारण्याचा सल्ला पोलीसआयुक्तांनी दिला.
पिंपरी–चिंचवड शहराला प्रथमच आयआयटीची पार्श्वभूमी असलेले पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या रूपाने मिळाले आहेत. शहरातील पोलिसिंगच्या बाबतीत उपयोग काही बदल करणे आवशयक असल्याचे प्रतिक कारंजे यांनी सुचवले. त्यावर आयुक्तांनीआपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर औद्योगिक वसाहती आणि आयटी नगरी असलेल्या शहरासाठी होईल, अशी आशा व्यक्त केली.
शहरातील कोयता गॅंग आणि गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी विशाल दवणे यांनी केली. त्यावरपोलिसांनी आयुक्तांनी थेट आकडे सादर करत सांगितले कि, मागील चार महिन्यात एकूण 59 शस्त्रे व 276 कोयते जप्त करण्यातआले आहेत. तसेच 135 कुख्यात गुंडांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशीच कडक कारवाईचालू राहील.