पिंपरी : रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट व रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिओ निर्मूलनासाठी करण्यासाठी सायकल रॅली चे आयोजन केले. पिंपरी चिंचवडवडचे पोलीस आयुक्त, आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीसह हि सायकल रॅली यशस्वी रित्या पार पडली.
जागतिक पोलिओ दिनानिमित्त आरसी पिंपरी एलिट व आरसी पुणे वेस्ट यांनी संयुक्तपणे २० किमी आणि ५०किमि साठी सायकल रॅली आयोजित केली. सर्वाधिक लोकप्रिय भारतीय आयकॉन, पोलीस आयुक्त, पीसीएमसी, पुणे, आयर्नमॅन, आयपीएस कृष्ण प्रकाश यांनी या सायकल राईडला प्रमुख पाहुणे म्हणून विशेष हजेरी लावली आणि सुमारे ५० किलोमीटरची सायकल रॅली अव्वल क्रमांकासह पूर्ण केली .
सन्माननिय अतिथी, प्रांतपाल, जिल्हा ३१३१ चे रोटेरियन पंकज शहा हे देखील सायकल रॅली मध्ये सहभागी झाले होते.
सायकलस्वारांसाठीचा मार्ग २० किमी आणि ५० कि.मी. अंतराचा होता, जो पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड च्या प्रमुख निसर्गरम्य ठिकाणा वरून सायकल फेरी पूर्ण करीत होता.
६ वर्षे ते ७५ वर्षे वयोगटातील १२० हून अधिक सायकलपटू या रॅलीत सहभागी झाले आणि त्यानंतर गौरवशाली फिनिशर्सचा पदक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सहभागींमध्ये, रोटरी इंटरनॅशनल ग्लोबल पोलिओ एरीडिकेशन ड्राइव्हची सखोल भावना पुन्हा जागृत केली व त्यांनी उत्साहाने या रॅलीत भाग घेतला.
फिल्टरम प्राव्हेट लिमिटेड, ग्रीन सोल्युशन्स चे रो. सागर अहिवळे आणि कल्याणी एन्टरप्राइझेस चे रो. अनिल नेवाळे यांचे मोलाचे सहकार्य ह्या रॅलीला लाभले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन रो.मंदार गद्रे यांनी केले, प्रेसिडेंट रिटा कोठारी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली, प्रांतपाल रो पंकज शाह यांनी रोटरी करत असलेल्या कामाची माहिती दिली, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रोटरी पोलिओ साठी करीत आलेल्या कामाचे कौतुक केले, प्रेसिडेंट रो रवींद्र वसंत भावे यांनी सर्व पोलीस स्टाफ, सर्व प्रयोजकांचे आणि सर्व भाग घेतलेल्या सायकल पटुंचे आभार मानले.