हा प्रकार दिघी पोलीस ठाण्यात एक जानेवारी रोजी घडला.
अनिल संपत निरवणे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.याबाबत पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई निरवणे दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे एका पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, त्यांच्यात अंतर्गत वादविवाद झाले. त्यातून चिडून निरवणे यांनी संबंधित उपनिरीक्षक महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देत दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना १ जानेवारी रोजी घडली असून याबाबत तब्बल १८ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाळ तपास करीत आहेत.