विकेंड लॉकडाऊनमध्ये विनामास्क फिरणाऱ्या 627 जणांवर पोलिसांची कारवाई

0

पिंपरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. विकेंड लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन दिवसांत “शनिवारी आणि रविवारी” पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तातंर्गत विनामास्कच्या आदेशाचा भंग करणाऱ्या 627 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

शहरातील करोना बाधितांची संख्या आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. आदेशांचे भंग करुन मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.

राज्य शासनाने 1 मे पर्यंत शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेतील नुकताच शेवटचा विकेंड लॉकडाऊन झाला. प्रशासनाच्या आवाहनाला, आदेशाला नागरिक थेट पायदळी तुडवत आहेत. कोरोना साथीला एक वर्षाहून अधिक काळ झाला. मात्र नागरिक अजूनही त्याबाबत खबरदारी घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसही अशा नागरिकांवर कठोर कारवाई करीत आहेत.

एमआयडीसी भोसरी (54), भोसरी (17), पिंपरी (74), चिंचवड (58), निगडी (40), आळंदी (30), चाकण (37), दिघी (16), सांगवी (29), वाकड (25), हिंजवडी (126), देहूरोड (02), तळेगाव दाभाडे (26), तळेगाव एमआयडीसी (03) चिखली (15), रावेत चौकी (18), शिरगाव चौकी (39),

Leave A Reply

Your email address will not be published.