बलात्कार प्रकरणात पोलिसालाच पोलिस कोठडी

0

पुणे : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याला १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी दिला.

संदीप बळिराम वाघमारे (वय २९, रा. वरळी पोलिस मुख्यालय, मूळ रा. लातुर) असे पोलिस कोठडी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याबाबत २७ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. आरोपी पोलिसाने चार जानेवारी ते १७ जुलै २०२० या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून तर त्यानंतर २० मे २०२१ पर्यंत लग्न झाले आहे, असे सांगून तरुणीशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्या आई-वडिलांकडून अडीच लाख रुपये रोख आणि अडीच तोळे सोने घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी वाघमारे याला बुधवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, तसेच वाघोली, कांजूरमार्ग, लातुर, पनवेल या ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. तेथे जाऊन तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.