पुणे : एमपीएससीत उत्तीर्ण झालेल्या मूळ कोपरगावच्या दर्शना पवार (२६) हिचा खूनच झाल्याचे पोलिसांनी सोमवारी रात्री सांगितले. शवविच्छेदन अहवालातून हे स्पष्ट झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ५ पथके तयार केली आहेत. दर्शनाचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या सतीचा माळ परिसरात रविवारी सापडला होता.
तिच्या मृतदेहाचे लचकेही तोडण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड करण्यात आली होती. एमपीएससी परीक्षेत ती राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती.
दर्शना पवार ही तिचा मित्र राहुल हंडोरे याच्यासोबत राजगड किल्ल्यावर गेली होती. दोघेही एका सीसीटीव्ही दिसले आहेत. मात्र, घटनेनंतर राहुल एकटाच परतल्याचे दिसले. हंडोरेने बंगळूरूच्या एटीएममधून पैसे काढून दुसऱ्या राज्यात गेल्याचे आढळल्याने त्याच्यावरच पोलिसांना संशय आहे.