डॉक्टरला मारहाण प्रकरणी पोलिसास अटकपूर्व जामीन मंजूर

0

पुणे : बाणेर येथील कोव्हीड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह व नर्सिंग स्टाफ मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सचिन सिद्धेश्वर गायकवाड या पोलिस कर्मचाऱ्यास न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश श्रीमती ए.व्ही. रोट्टे यांनी हा आदेश दिला.

डेडिकेटेड कोव्हीड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह वारंवार कॉल करून देखील पेशंट बद्दल माहिती न दिल्याने सागर गायकवाड याने डॉक्टरांशी हुज्जत घातल्याची तक्रार तेथील डॉक्टर अजयश्री अधिकराव मस्कर यांनी चतुःशृंगी पोलिस स्टेशन येथे केली होती. त्यानंतर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात देखील डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांचेशी हुज्जत घातल्याचा आरोप करत सागर सिद्धेश्वर गायकवाड व सचिन सिद्धेश्वर गायकवाड यांच्याविरुद्ध चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सचिन गायकवाड यांनी तत्काळ त्यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावेळी फिर्यादी हे शासकीय कर्मचारी नसून ते योग्य कामकाज करत नसल्याने जाब विचारल्याचा राग मनात धरून तब्बल सात तासांचा उशीर करून गायकवाड बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद आरोपीतर्फे ॲड. ठोंबरे यांनी केला. या प्रकरणाची हकिगत बघता आरोपीतर्फे केलेला युक्तिवाद मान्य करत सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड यास हंगामी अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. आरोपीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार, ॲड. अभिजित सोलनकर यांनी कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.