पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या आत्महत्येचे कारण समजले

0

पुणे : पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या शिल्पा चव्हाण यांनी आज सकाळच्या सुमारास पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं संपूर्ण राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक कारणामुळे शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलीस दलातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी होत्या. निडर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्या परिचित होत्या.. इतकी डॅशिंग महिला अधिकारी आत्महत्या करू शकते यावर पोलीस दलातील अनेकांचा अजूनही विश्वासच बसत नाही. प्राथमिक माहितीच्या आधारे तरी शिल्पा चव्हाण यांनी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचं समोर येत आहे.

शिल्पा चव्हाण या विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर मध्ये राहत होत्या. मुलगा आणि त्या असे दोघेच त्या ठिकाणी. त्यांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांचा मुलगा देखील घरी नव्हता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आत्महत्येची वार्ता वार्‍यासारखी पसरली आणि पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. चव्हाण यांनी आत्महत्या केल्यामुळे पुणे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.