मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि डीसीपी पराग मणेरे यांच्याविरोधात गंभीर आरोप करणाऱ्या पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केलीय. त्यांनी याआधी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिलेली आहे. यामुळेच परमबीर सिंह आणि त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांपासून जिवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे.
पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी डीसीपी पराग मणेरेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सगळ्या अधिकाऱ्यांची बदली झाली पण परमबीर यांच्या मर्जीतले असल्याने मणेरे यांची बदली झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक लाचलुचपत विभाग यांना लिहिलेल्या 14 पानी पत्रात त्यांनी अनेक धक्कादायक आरोप केलेत. 28 एप्रिलच्या एफआयआरमध्ये डीसीपी पराग मणेरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत.
पोलीस निरीक्षक घाडगेंच्या पत्रातील प्रमुख आरोप खालीलप्रमाणे,
घाडगे यांनी आपल्या सविस्तर पत्रात 17 मार्च 2015 ते 31 जुलै 2018 दरम्यान परमबीर सिंग यांनी केलेल्या कुकर्माचा पाढा वाचला. ठाणे आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीत 1 कोटी ते 50 लाख रुपये घेण्यात येत होते असाही आरोप त्यांनी केलाय.
परमबीर सिंग यांनी हद्दीतील उपायुक्तांकडून सोन्याची बिस्किटे, तर सहाय्यक आयुक्तांकडून 30 ते 40 तोळे सोने घेतल्याचा आरोप.
कल्याणच्या बाजार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोज 250 ते 300 डंपर वाळूमाफिया वाहतूक करीत होते. त्यात पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांची भागीदारी असल्याचा आरोप.
रोज कोट्यवधींची उलाढाल होत होती. रेती उत्खनन ते वाहतूक असा व्यवहार होता. त्यात जे अधिकारी डंपरवर कारवाई करतील त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत होते. अशाच एका गुन्ह्यात अडकवल्याचा घोडगेंचा आरोप. याच प्रकरणी घोडगे यांनी 17 मार्च 2016 रोजी लेखी तक्रार दाखल केली होती.
परमबीर सिंग याचा मुलगा रोहन याने सिंगापूरमध्ये 2000 कोटींची गुंतवणूक केली. ती संपत्ती कुठून आली? या बेहिशोबही मालमत्तेची चौकशी ips लाचलुचपत खात्यामाध्यमातून करावी.