अपघातात पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

0

सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण परिसरात गुरुवारी (दि.18) पहाटे झालेल्या अपघातात सहाय्यक उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे.

सूर्यंकांत गायकवाड (54 रा. उरण, मूळ रा. सलगर वस्ती, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. गायकवाड हे सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर रुजू होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

गुरुवारी सुट्टी संपत असल्याने गायकवाड नोकरीवर रुजू होण्यासाठी जात होते. भिगवण परिसरात गुरुवारी पहाटे त्यांच्या कारची धडक ट्रक्टरला पाठिमागून बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन गायकवाड यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्यासोबत असलेले इतर दोन जण जखमी झाले आहेत.

गायकवाड हे उरण येथे सहकुटुंब वास्तव्यास होते. दोन वर्षापूर्वी उरण पोलीस ठाण्यातून त्यांची सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात राखीव विभागात बदली झाली होती. सध्या ते दोन दिवसांची सुट्टी घेऊन सोलापूर येथील सलगर वस्ती येथील मूळ गावी गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.