स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

0

पिंपरी : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. यामध्येदोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 18) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कृष्णा नगर, नवीसांगवी येथे करण्यात आली.

कुणाल राममूर्ती रेड्डी (वय 39, रा. बोपोडी पुणे) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीपोलीस नाईक मारुती करचूंडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला. आरोपींनीदोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये स्पा मालक कुणाल रेड्डी आणि एक महिला या दोघांनापोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.