सिंहगडाच्या पायथ्याशी सुरु असलेल्या पार्टीवर पोलिसांचा छापा

0
पुणे : कोरोना आणि अतिवृष्टीमुळे राज्यासह पुणे जिल्ह्यात
तणावाचे वातावरण आहे. जिल्ह्यात संचारबंदी असताना सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी सुरु असलेल्या ओल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. हॉटेल मालकासह 6 पुरूष व 4 महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी विनय सुभाष कांबळे (32, रा. आकाश नगर, वारजे), संदीप शंकर कोतवाल (47, रा. हिंगणेमळा, हडपसर), सचिन विठ्ठल शिंदे (38, रा. आनंदनगर, सिंहगड रोड), कालीदास शशिराव काकडे (50, रा. हडपसर), विठ्ठल विजय मोरे (43, रा. हडपसर), राजेश बलभिम वाघमारे (45, रा. हडपसर) व चार महिलांवर हवेली पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 269,270,188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर डॉ. निखील भाकरे फरार झाला आहे.
सिंहगड पायथ्याशी गोळेवाडी येथील सानवी रिसॉर्टमध्ये  डान्स पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता साउंड सिस्टीमवर गाणी लावून एल.ई.डी (LED) लावून काही लोक नाचत असल्याचे दिसले. या ठिकाणी नाचणाऱ्या व्यक्तींनी आणि इतर चार महिलांनी तोंडाला मास्क न लावता नाचत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी सहा पुरुष आणि चार महिलांवर कारवाई करुन त्यांच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिस आल्याचे समजताच डॉ. निखील भाकरे हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार पासलकर, क्षिरसागर, मंगेश भगत अमोल शेडगे, महिला पोलीस हवालदार नंदा कदम यांच्या पथकाने केली.
Leave A Reply

Your email address will not be published.