पोलीसाचा तडीपार गुंडाकडून वार करून खून

0

पुणे : वर्षांपासून तडीपार असलेल्या गुंडाने बुधवार पेठेत एका पोलीस हवालदाराचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार ताजा असताना लगेचच त्याच परिसरात एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा अज्ञाताने खून केला आहे.

पोलीस हवालदार समीर सय्यद (48) असे खून झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तडीपार गुंड प्रवीण महाजन याने हा खून केला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या राणी ( 24) नावाच्या महिलेचा खून झाला आहे. अद्याप तिचे पूर्ण नाव आणि तिचा खून करणाऱ्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण महाजन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. बॉडी ऑफेन्सचे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कृत्यामुळे त्याला गेल्या वर्षी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार देखील करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.