पुणे : समोरून चोर पळून जात असताना ही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता स्वतः पळून जाणाऱ्या त्या पोलिसांना अखेर पुणे पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. पळून जात असल्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली होती. त्यानंतर या संपूर्ण घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
प्रवीण रमेश गोरे व अनिल दत्तू अवघडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
औंध येथील एका सोसायटीत चोर शिरले असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर रात्र गस्तीवर असताना हे दोन्ही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी या पोलिसांचा आणि चोरट्यांचा आमनासामना झाला. परंतु चोरट्यांच्या हातातील कोयते व कटावणी पाहून या पोलिसांनी पळ काढला. यातली एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हातात तर रायफल होती. असे असतानाही त्यांनी एक चोर त्यांना रोखण्याचा प्रयत्न ही केला नाही.
इतकेच नाही तर चोरटे पळून गेल्यानंतर या दोघा पोलिसांनी त्याची माहिती व कि टोपी किंवा मोबाईल द्वारे ही कळली नाही. त्यांच्या या कृतीमुळे जनमानसातील पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असल्याचा ठपका ठेवत या दोघांनाही निलंबित करण्यात आले.