‘सेफ सिटी’ करण्यासाठी पोलिसांचे बळकटीकरण करणार : देवेंद्र फडणवीस

0

पिंपरी : पिंपरीचिंचवड शहराला सेफ सिटी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठीपोलिसांचे बळकटीकरण करण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीव्यक्त केले.

पिंपरीचिंचवड शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजितकार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पिंपरीचिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय केले. आता पोलिसांचे बळकटीकरण करणेआवश्यक आहे. मनुष्यबळ आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आयुक्तालयासाठी नवीन इमारत केली जाणार असूनअधिक अधिकारी देखील दिले जाणार आहेत.

पिंपरीचिंचवड शहर हे शहर आहे आणि गाव देखील आहे. पिंपरीचिंचवडला सेफ सिटी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी अगोदरपोलिसांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. या बळकटीकरणाला सुरुवात याच वर्षी होणार असल्याचेही फडणवीस यांनीसांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.