‘डुग्गू’ च्या अपहरण प्रकरणाच्या मुळाशी पोलीस जाणार

सुरक्षा रक्षक दादाराव जाधव ठरले 'देवदूत'

0

पुणे : स्वर्णव चव्हाण उर्फ ‘डुग्गू’ हा अपहरण झालेला 4 वर्षांचा चिमुरडा 8 दिवसांनी सुखरूप सापडला. पुणे पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं होतं. जवळपास 300 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी डुग्गूला शोधत होते. डुग्गू सापडला मात्र यामागील खर सत्य अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे।पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाणार असल्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सांगितले.

अपहरणकर्त्यांनी डुग्गूला पुनावळे ब्रीजजवळ सुरक्षारक्षक दादाराव जाधव यांच्या कडे सोपवले. दहा मिनिटात काही तरी घेऊन येतो असे सांगून त्या नराधमाने तेथून पळ काढला. बराच वेळ झाला तरी परत कोणी आल्याने जाधव यांना संशय आला. त्यांनी शोधा शोध केली असता डुग्गूच्या बॅगवर त्याच्या घरचा मोबाईल नंबर सापडला. या क्रमांकावर जाधव यांनी संपर्क साधला.

जाधव यांनी घडलेला प्रकार सांगितला. डुग्गूच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी खात्री करण्यासाठी व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी तो डुग्गू असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ डुग्गूचे काका आणि पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्याला आपल्याकडे घेतले.आपल्या काळजाचा तुकडा सुखरुप सापडल्याने गुड्डूच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले. तसेच दादाराव जाधवांचंही कौतुक केलं जातं आहे. डुग्गू सापडल्याच्या आनंदात लोकांनी पेढे वाटून आनंदं साजरा केला. 

डुग्गू 11 जानेवारीला हरवला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.  डुग्गू सुखरुप सापडल्यानंतर तो इतके दिवस कुठे होता, हे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.

“या सर्व प्रकरणी आम्ही सखोल तपास करत आहोत. या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरु होता आणि तो राहिल. या प्रकरणाच्या मुळाशी पुणे पोलीस 100 टक्के जातील. आमच्याकडे योग्य धागेदोरे आहेत. आता आम्ही तपास आणखी वेगाने करुन सर्व सत्य पोलीस समोर आणतील”, असा विश्वास पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी व्यक्त केला.

“आम्ही तपासाच्या अंतिम टप्प्यात आहोत. या क्षणाला अधिक माहिती देणं उचित राहणार नाही. या प्रकरणात कोणतीही बाधा येईल, असं कोणतही वृत्त माध्यमांनी देऊ नये”, असं आवाहनही डॉ. रविंद्र शिसवे यांनी केलं. 

Leave A Reply

Your email address will not be published.