विधवेकडून पैसे खाणारा पोलीस कर्मचारी निलंबित

0

पिंपरी : पेट्रोल पंप मंजूर करण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्याच्या बहाण्याने एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी विधवा महिलेकडून ऑनलाईन पैसे घेतली. याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधित कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित केले. मंगळवारी याबाबतचे आदेश देण्यात आले.

महेंद्र नांदले (४०) असे निलंबित मंत्रालयीन कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिघी येथील लष्करातून निवृत्त झालेल्या दिवंगत नगरसेवकाच्या पत्नीने स्वतःच्या मालकी जागेत मुलाच्या नावे पेट्रोल पंपा मिळण्यासाठी अर्ज केला होता.

त्यानुसार, भारत पेट्रोलियम कंपनीने पेट्रोल पंप देखील मंजूर केला. होता मात्र, दरम्यानच्या काळात जागेवर पोलीस ठाण्याचे आरक्षण असल्याचे समोर आले. त्यामुळे महिलेने जागा बदलून दुसऱ्या जागेवर पेट्रोल पंप मिळण्याची मागणी केली.

भारत पेट्रोलियम कंपनीने जुन्या जागेवर पंप सुरू करण्यास पोलिसांची हरकत असल्याचे प्रमाणपत्र मागितले. त्यामुळे तक्रारदार महिलेने पोलिस आयुक्त कार्यालय गाठले.

तत्कालीन मंत्रालयीन कर्मचारी परदेशी यांनी महिलेला प्रमाणपत्र दिले. मात्र, त्यामध्ये काही त्रुटी असल्याने भारत पेट्रोलियम कंपनीने त्यांना दुसरे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले.

त्यानुसार, तक्रारदार महिलेची मुलगी आयुक्त कार्यालयात येऊन सध्या नियुक्तीस असलेल्या नांदले याला भेटली. त्यावेळी नांदले याने प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.

प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदार महिला आणि त्यांच्या मुलीने नांदले याच्या फोनपेवर एकूण साडेआठ हजार रुपये पाठवले. तसेच, वेळोवेळी आणखी रोख स्वरूपात पैसे दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी संबंधित महिलेला बोलावून तिच्याकडे चौकशी केली. महिला तक्रार घेऊन आयुक्तांकडे गेली असल्याचे कळताच नांदले याने महिलेच्या फोनपेवर माघारी पैसे पाठवले.

मात्र, विधवा महिलेचे पैसे खाल्ल्याने संतापलेल्या आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.