पॉक्सो, आयटी कायद्यांतर्गत ट्विटरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

0

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ट्विटर इंडिया नकारात्मक कारणांसाठी चर्चेत आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात ट्विटरवर पॉक्सो कायद्यांतर्गत आणि नव्या आयटी कायद्यांतर्गत ट्विटरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला. उत्तर प्रदेशतील गाझियाबाद आणि बुलंदशहर नंतर आता दिल्लीमध्ये ट्विटरविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाईल्ड पॉर्नोग्राफी कंटेट वापल्याप्रकरणी ट्विटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून (NCPCR) दाखल तक्रारीवरुन ट्विटरविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, “सायबर सेलने NCPCRच्या एका तक्रारीच्या आधारे ट्विटर विरोधात पॉक्सो अॅक्ट आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ट्विटरवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी लिंक आणि केंटेन्ट टाकला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ट्विटर इंक आणि ट्विटर कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विरोधात तक्रार देण्यात आली आहे”

neww
Leave A Reply

Your email address will not be published.