प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील : राऊत

0

मुंबई : प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील आणि त्यांच्याविषयी लवकरच बातमी कळेल, असं विधान खासदार राऊत यांनी केलं. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमध्ये मातोश्रीवर चर्चा झाली. बैठकीनंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले,”शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री आहेत. पण, आज माझी चर्चा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झाली. संघटनात्मक काम महत्त्वाचं आहे. भविष्यात पक्ष मजबूत असेल, तर सरकार अधिक काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहिलं. त्यासाठी पक्षसंघटेचं काम करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर सरकारबद्दलही चर्चा झाली. अधिवेशन असल्यानं त्यांची तयारी सुरू आहे. त्या मी काही पडत नाही,” असं राऊत म्हणाले.

“आजच्या बैठकीबद्दल बाहेर चर्चा व्हावी, असं काही नाही. सर्वकाही स्थिर स्थावर आणि सुरळीत सुरू आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या. कुणी कितीही ढोल बडवले, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार आपला कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेल. त्याच्याविषयी मी सगळ्यांना खात्री देतो,” असं म्हणत राऊत यांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी काही मेसेज दिला होता का? या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, “पवार यांचा मेसेज त्याचदिवशी सांगितला. उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहेत. त्यांची लोकप्रियता वाढत आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला भविष्यात होईल. विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेतलं पाहिजे, असं पवार म्हणाले असतील तर त्यात चुकीचं काय? राष्ट्रीय स्तरावर आघाडी उभी करण्याचा प्रयत्न होतोय. त्यात प्रादेशिक पक्षांना घेणं योग्यच आहे,” असं राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.