मुंबई ः ”जलयुक्त शिवार योजनेला अपयशी ठरविण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. हे सूडबुद्धीने केलं जात आहे. अशा चौकशीमुळे काडीमात्र फरक पडणार नाही”, असे मत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मांडले आहे.
https://twitter.com/i/status/1333786310729818120
महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे भाजपाने ईडीच्या चौकशा आणि तसाप सुरू केला, याचा सूड घेत राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
भारतीय नियंत्रक आणि मलालेखापरिक्षक म्हणजेच कॅगने जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता असल्याचे सांगितले होते, त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी माजी सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.