राज्य सेवेची पूर्व परीक्षा १४ मार्चला

0

मुंबई : कोरोनामुळे देशात झालेले लॉक डाऊन आणि मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून राज्य सेवेची पूर्व परीक्षा १४, तर तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी होणार आहे.

मराठा आरक्षणानुसार ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून संधी मिळेल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असलेल्यांना ‘ईडब्ल्यूएस’अंतर्गत संधी दिली जाईल. १५ जानेवारीपर्यंत सुधारित अर्ज भरून घेतले जातील.

कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य खबरदारी घेऊनच राज्यातील आठशे परीक्षा केंद्रांवर परीक्षा होईल. तर विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहावे लागेल.

१४ मार्च रोजी राज्य सेवेची पूर्व परीक्षा, २७ मार्च रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि ११ एप्रिल राेजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.