पिंपरी : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा दलात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना विविध पदके जाहीर करण्यात आली. यामध्ये पिंपरी–चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना देखील विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यातआले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दरवर्षी विविध पदक जाहीर केली जातात. यासाठीवर्षभर निवड प्रक्रिया सुरु असते. गुणवत्तापूर्ण सेवा, विशेष कामगिरी याबद्दल ही पदके दिली जातात. दरम्यान, यावर्षी केंद्रीय राखीवपोलीस दलातील एक अधिकाऱ्याने दाखवलेल्या शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. देशातील २२९ जणांना पोलीसपदक जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३३ जणांचा समावेश आहे. तर, ६४२ जणांना उत्कृष्ठ सेवेसाठी पोलीस पदक जाहीरकरण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४० जणांचा समावेश आहे.
देशभरातील ८२ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. यामध्ये महाराष्ट्रातील अवघे तीन अधिकारी आहेत. अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरेयांचा यामधेय समावेश आहे.
चौबे यांची कारकीर्द
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे हे हे १९९५ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. त्यांनीकानपुर येथून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि अपारंपरिक ऊर्जा संसाधनांमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतली आहे. सुरुवातीला त्यांनी रत्नागिरी, अकोला आणि सोलापूर (ग्रामीण) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. दरम्यान, त्यांनी मुंबईतही झोन चारची धुरा सांभाळली आहे
महाराष्ट्र शासनाने सन २००९ मध्ये चौबे यांना पदोन्नती दिली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्यातील काही महत्वाच्या ठिकाणी काम केले. सन २०१२ मध्ये पोलिस मेडल आणि सन २०१० मध्ये पोलिस महासंचालक बोधचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सन २०१६मध्ये चौबे यांनी सायबर सिक्युरिटी आणि मोबिलिटी कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. तसेच, सायबर कायद्याचा अभ्यासक्रम यशस्वीपणेपूर्ण केला. परराष्ट्र मंत्रालयात प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी म्हणून काम करत असताना ते कोअर कमिटी सदस्यांपैकी एक होते. त्यावेळी चौबे यांनी पासपोर्ट जारी करण्याच्या प्रणालीमध्ये शंभर टक्के ऑनलाइन पेपरलेस प्रक्रिया प्रणालीमध्ये क्रांती घडवूनआणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दरम्यान, चौबे यांनी गांधी केंद्र, भारतीय संस्कृती केंद्र, भारतीय दूतावास येथे समुपदेशक/संचालक म्हणून काम केले आहे. नाशिक येथे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत असताना चौबे यांनी गुन्ह्याच्या तपासातविज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर, यासारख्या विविध विषयांवर अनेकांना प्रशिक्षण दिले. आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई, येथे सहपोलीसआयुक्त पदावर देखील त्यांनी काम केले त्यानंतर कायदा व सुव्यवस्था, मुंबई पदाची देखील भूमिका त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. दरम्यान, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे देखील चौबे यांनी काम पाहिले. सध्या चौबे पिंपरी चिंचवड शहरपोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. येथे देखील एक अपर पोलिस आयुक्त, दोन उपायुक्त आणि चार सहायक आयुक्तांची पदेमंजूर करून आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.