पंतप्रधान मोदींनी घेतली ‘कोविशिल्ड’ लसीची माहिती
पुणे दौऱ्यात सिमर इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीसंदर्भात घेतला आढावा
पुणे : ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूट करत आहे. त्यासंदर्भातील माहिती पंतप्रधान नंरेंद्र मोदी इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला कार्यपद्धती समजावून सांगितली. लशीच्या उत्पादनासंबंधी मोदींना आढावा घेतला.
पंतप्रधान मोदी अहमदाबाद, हैदराबाद आणि नंतर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. यावेळी पुनावाला कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले. सिरम ही जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती करणारी कंपनी आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील कोविशिल्ड प्रकल्पामध्ये आतापर्यंत ४ कोटी डोस तयार झाले आहेत. ऑक्सफर्डने या लसीचे नामकरक ‘कोविशिल्ड’ असे केले आहे. ही लस करोनावर ७० टक्के परिणाम करणारी आहे.