नवी दिल्ली ः केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी आंदोलकांनी ८ पानांचं खुलं पत्र लिहून कृषी कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी केंद्र सरकार चर्चेला तयार असल्याचे सांगितले आहेत. तसेच मध्यप्रदेशामधील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे बोलणार आहेत.
दिल्लीत मागील २० दिवसांहून अधिक काळा सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदींना मत व्यक्त केले होते. ते म्हणाल होते की, ”विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. त्यांची सत्त असताना हे नेते याच कायद्यांचे समर्थन करत होते. पण, आता राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालविण्याचा विरोधकांचा डाव आहे”, असे मोदी म्हणाले होते.
केंद्राने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी केंद्राविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. आता या आंदोलनाल २३ दिवस पूर्ण झालेले आहेत. दरम्यानच्या काळात शेतकरी आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. तसेच अश्रुधूरांचाही वापर केला. नंतर शेतकऱ्यांनी एक दिवस भारत बंद केला. तरीही हे आंदोलन थांबत नाही, हे पाहूनच पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार झाले आहेत.