पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. देशात लागू केलेले नवीन तीन कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. आज पंतप्रधान मोदी देशवाशियांना संबोधित करत होते त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. गेली अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यास आज यश मिळाले आहे.

आज मैं आपको, पूरे देश को, ये बताने आया हूं कि हमने तीनों कृषि कानूनों को वापस लेने का निर्णय लिया है।

इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, हम इन तीनों कृषि कानूनों को Repeal करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) November 19, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याच्या या महामोहिमेत देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. देशातील शेतकर्‍यांना विशेषत: लहान शेतकर्‍यांना अधिक बळ मिळावे, त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमाल विकण्याचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, हा उद्देश होता.

वर्षानुवर्षे देशातील शेतकरी, देशातील कृषी तज्ज्ञ, देशातील शेतकरी संघटना सातत्याने ही मागणी करत आहेत. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. यावेळीही संसदेत चर्चा झाली, मंथन झाले आणि हे कायदे आणले गेले. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेतकरी संघटनांनी त्याचे स्वागत व पाठिंबा दिला. त्या सर्वांचा मी आज खूप ऋणी आहे.

आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.