पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन

0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी दिव्यांगमुलांसोबत प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम पुणे महापालिकेतील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी रवाना झाले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा माई ढोरे, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 किलोमीटरच्या पट्ट्यात गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा प्रवास केला. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी डिजीटल ॲपच्या माध्यमातून तिकीट खरेदी करून मेट्रोने प्रवास केला. त्यानंतरच ते मेट्रोमध्ये जावून बसले. यावेळी त्यांच्यासोबत दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांची पंतप्रधानांनी आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यासोबत त्यांनी गप्पा मारल्या. तत्पूर्वी मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडाही दाखवला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.