सर्व सामान्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय…..आ. महेश लांडगे

‘सेवा समर्पण अभियानास’ पिंपरी चिचंवडमध्ये सुरुवात

0

पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य नागरीकांचा सर्वांगिण विकास व्हावा हे ध्येय ठेऊन अनेक कल्याणकारी योजना जाहिर केल्या. यामध्ये ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ; सर्वांसाठी मोफत लसीकरण योजना ; उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना ; आयुष्यमान भारत योजना ; पंतप्रधान आवास योजना अशा अनेक योजनांचा लाभ प्रत्यक्ष नागरीकांना मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपाचे कार्यकर्ते ‘सेवा समर्पण अभियान’ शहरभर राबवित आहेत. याची सुरुवात शुक्रवारी (दि. 17 सप्टेंबर) पिंपरी चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या प्रभागातून  करण्यात येत आहे अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष आ. महेश लांडगे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवासानिमित्त शहर भाजपाच्या वतीने ‘सेवा समर्पण अभियानाचे’ उद्‌घाटन आ. महेश लांडगे यांच्या हस्ते भोसरी, खंडोबा माळ येथे शुक्रवारी (दि. 17 सप्टेंबर) करण्यात आले. यावेळी संयोजक व स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, नगरसेवक राजेश लांडगे, भाजपाचे शहर प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस व सेवा समर्पण अभियान प्रमुख विजय फुगे, सरचिटणीस राजू दुर्गे, भोसरी मंडळ सरचिटणीस निवृत्ती फुगे तसेच रोहीणी मांढरे, रविंद्र नांदूरकर, किरण लांडगे, राजेश टाकळकर, निवृत्ती लांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. महेश लांडगे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्या उपस्थितीत ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ अंतर्गत प्रतीव्यक्ती प्रतिमाह 3 किलो गहू , 2 किलो तांदूळ वाटप करण्यात आले. तसेच हातगाडी व पथारी व्यावसायिकांना उन्हापावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मोठ्या मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी आ. महेश लांडगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सात वर्षात जे धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे हिंदूस्थानचा नावलौकिक जगात वाढला आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेवटच्या घटकाला देखिल लाभ मिळावा म्हणून अंत्योदय योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, अटल बांधकाम आवास योजना (शहरी अर्थसहाय्य), अटल बांधकाम आवास योजना (ग्रामिण अर्थसहाय्य), मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अशा विविध योजना जाहिर केल्या आहेत. याचा प्रत्यक्ष लाभ सर्व सामान्य गरजू नागरिकांना मिळवून देण्यासाठी काम करीत आहोत.

संजोयक स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा सर्व सामान्य गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवून साजरा करावा. मागील दिड वर्षापासून कोरोनामुळे अनेक कुटूंबांना आपला चरितार्थ चालविणे देखिल अवघड झाले आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी  ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ अंतर्गत प्रतीव्यक्ती प्रतिमाह 3 किलो गहू , 2 किलो तांदूळ वाटप करण्यात येत आहे.
कोरोनामुळे पिंपरी चिंचवड शहरातीलही हजारो नागरिकांचा रोजगार बंद झाला आहे. यातील अनेक बंधू भगिनी पथारी व हातगाडीवर किरकोळ वस्तू व भाजीपाला विक्री करुन कष्टमय जीवन जगत आहेत. भोसरीतील या व्यवसायिकांना उन्हापावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे. उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून गरजूंसाठी मोफत लसीकरण शिबीर राबविण्यात येणार आहे अशी माहिती संजोयक स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

स्वागत प्रास्ताविक शहर भाजपा सरचिटणीस व सेवा समर्पण अभियान प्रमुख विजय फुगे, आभार निवृत्ती फुगे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.