त्यामुळे रोगाचे थैमान सुरू असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोरोणा पसरवणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच शहरातील सर्वच खाजगी अंब्यूलंस नगरपालिकेने ताब्यात घेऊन ‘ ओला / उबर ‘ ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने अंब्यूलंसचे कामकाज करावे. असे केल्याने अंब्यूलंसची उपलब्धता नागरिकांना समजेल. अंब्यूलंस
एकाच जागेवर उभ्या राहणार नाहीत त्या प्रभावीपणे वापरल्या जातील.यामुळे अनेक रुग्णांना फायदा होईल आणि त्यांचे प्राणही वाचतील.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने हे निवेदन मेलद्वारे आणि इतर समाज माध्यामांमार्फत आयुक्त राजेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले.