नवी दिल्ली ः कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब- हरियाणाच्या छेडलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून काॅंग्रेसने मोदी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली होती. नव्या कृषी कायदे मागे घेण्यासाठी राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी काॅंग्रेसचा मोर्चा रोखला.
यामुळे काॅंगेस नेत्यांनी १० नेत्यांनी जनपथ रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली होती. त्यामध्ये प्रियंका गांधी उपस्थित होत्या. पोलिसांनी आंदोसन करणाऱ्यांना आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांनी प्रसार माध्यमांवर पोलिसांच्या कारवाईवर राग व्यक्त केला. गांधी म्हणाल्या की, “या सरकारविरोधात असणारे कोणतेही मतभेद दहशतवादाचे घटक असल्याचं वारंवार सांगितलं जातं”, अशी टीका मोदी सरकारवर केली.
राष्ट्रपतींना भेटण्यासाठी केवळ तीन नेत्यांना परवानगी देण्यात आली होती. यासंबंधी अतिरिक्त पोलीस उपायुक्त दीपक यादव म्हणाले की, “काँग्रेस नेत्यांना राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तीन नेते राष्ट्रपतींची भेट घेऊ शकतात. दरम्यान राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याआधी काँग्रेस मुख्यालयाबाहेर १४४ कलम लागू करण्यात आलं होतं.”