हिंजवडी : आयटी पार्क आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सीमेला लागून असणाऱ्या मारुंजी गावातील वाढते गृहप्रकल्प, यामुळे निर्माण होत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या अधिकृत उमेदवाराना निवडून द्यावे, यासाठी ग्रामस्थ प्रचारात सहभागी होत आहेत.
मारुंजी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे अधिकृत उमेदवार अर्जुन बाबुराव बुचडे, कावेरी संदीप बुचडे, दत्तात्रय तुकाराम सुतार, यांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला जोर धरला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.
मारुंजी गाव हे हिंजवडी आयटी पार्कला लागून असून काही कंपन्या गावच्या हद्दीत आहेत. तर एका बाजूने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सीमा आहे. यातच जवळून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग गेला आहे. या सगळ्यामुळे मारुंजी गावच्या हद्दीत मोठं मोठे गृहप्रकल्प, मोठ्या शाळा, महाविद्यालये, वाहनांची गोदामे व इतर गोदामे मोठ्या प्रमाणात आहेत.
मारुंजी गावात पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. यातच नवीन गृहप्रकल्प झाल्याने या ठिकाणी राहण्यास आलेल्यांना याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे अधिकृत उमेदवाराना सोडवायचा आहे. याच बरोबर इतरही नागरी समस्या भेडसावत आहेत.
मतदान अवघ्या तीन दिवसांवर आल्याने प्रचाराला वेग आला आहे. सोमवारी नितीन बुचडे, सोमनाथ बुचडे,. प्राचिताई बुचडे, बाजीराव जगताप, दशरथ जगताप, राघूजी बुचडे, आप्पासाहेब बुचडे, शंकर बुचडे, अमोल बुचडे, संतोष बुचडे, सुधीर बुचडे, सुखलाल महाराज बुचडे, बाबासाहेब बुचडे, मच्छ शिंदे, गावातील ज्येष्ठ नेते, प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने महिला, तरूण वर्ग उपस्थित होता.