पिंपरी : वेश्या व्यवसाय प्रकरणी वाकड येथील एका हॉटेलमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने छापा टाकून कारवाई केली. पश्चिम बंगालमधील तीन मुलींची सुटका करुन दोघांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आलेली आहे.
मुख्य महिला आरोपी आणि रॉनी बच्चनलाल भारती या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. तर प्रवीण बळीराम असटकर हा फरार आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी महिला तिच्या साथीदारांच्या मदतीने वेश्या व्यवसाय चालवत होती. ग्राहकांना वाकड परिसरातील हॉटेल बुक करुन घेण्यास सांगून त्या ठिकाणी पीडित तरुणींना पाठवत होती. याबाबत माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. त्यानंतर तपास करुन तीन पश्चिम बंगाल राज्यातील मुलींची सुटका केली आणि दोघांना अटक केली.