त्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना त्यांनी पत्र दिले. या लसीकरण मोहिमेसाठी शहरातील खासगी रुग्णालयांची मदत घेण्याची सुचना आमदार बनसोडे यांनी केली आहे. या खासगी रुग्णालयांच्या यंत्रणेचा वापर या मोहिमेसाठी होऊ शकतो, असे ते म्हणाले. सध्या ४५ वर्षावरील हे लसीकरण सुरु आहे. तर, येत्या १ तारखेपासून शहरातील लोकसंख्येत बहूतांश असलेल्या १८ वर्षावरील घटकालाही ती दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र व तेथील मनुष्यबळ वाढवावे लागणार आहे.
सध्या महापालिकेची ५५ तर खासगी ११ अशा ६५ केंद्रात ही लस दिली जात आहे. आतापर्यंत फ्रंटलाईन वर्करसह ४५ वर्षावरील अशा एकूण ३ लाख ६८ हजार ४१० नागरिकांना ती दिली गेली आहे.
मात्र, २५ लाखांच्या शहरात व त्यात साठ टक्यांहून अधिक असलेल्या तरुणाईला ती आता दिली जाणार आहे. त्यासाठी लसीकरण यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे . तो ताण येऊ नये तसेच सुरक्षितरित्या ही मोहीम पार पडावी म्हणू तिचे व त्यातही अधिकचे मनुष्यबळ व केंद्रांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना आमदार बनसोडे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही आणि मोहीम वेळेत फत्ते होईल, असे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान , महिनाभरात दहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा निश्चय महापौर माई ढोरे यांनीही बोलून दाखवला आहे.
मात्र, ते कसे करणार त्याचा आराखडा तयार केला गेलेला नाही. परिणामी ऐनवेळी मोठी गर्दी होऊन लसीकरणात गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या मोहिमेला गालबोटही लागण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बनसोडेंची वेळीच केलेली योग्य नियोजनाची सूचना अचूक आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम सुरळीत व सूरक्षित पार पडण्यास मोठी मदत होणार आहे.