प्रताप सरनाईकांनी दाखल केला कंगणाविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव 

0

मुंबई ः ईडीच्या धाडीमुळे राजकारणाच्या चर्चेत आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगणा राणावत हिच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. पाकिस्तानी क्रेडिट कार्डसंबंधी कंगणाने केलेल्या ट्विटमुळे माझी बदनामी झाली आहे, असा आरोप त्यांनी लावलेला आहे.

हिवाळी अधिवेशनात आलेल्या प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांनी सांगितले की, ”माझ्या घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं असं कंगणानं ट्विट केलं होतं. त्यात काही तथ्य नव्हतं. मात्र, तिने केलेल्या ट्विटमुळे प्रसार माध्यमांनी याबाबत बातम्या दिल्या, त्यामुळे माझी बदनामी झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांदेखील असं काही जाहीर केलं नव्हतं. असं असतानाही कंगणानं माझी आणि माझ्या कुटुंबियांची बदनामी करण्याकरीताहे ट्विट केलं. त्यामुळे अशा बातम्या देणाऱ्यांच्या आणि कंगणाच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे.”

ईडी चौकशीसंदर्भात सरनाईक म्हणाले की, ”ई़डीच्या चौकशीला मी आणि माझे कुटुंबीय सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. ज्यावेळी चौकशीची गरज भासेल त्यावेळी एका फोनवर दोन तासांत हरज होईन, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.”, अशीही माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.