१० संघांसह आयपीएल खेळवण्याचा प्रस्तावाला मान्यता

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात मोठा निर्यण

0

नवी दिल्ली :  बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये १० संघांसह आयपीएल खेळवण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.  आयपीएलच्या १३ व्या पर्वात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला अपयशाचे तोंड पाहावे लागले. त्याचबरोबर अन्य संघांनाही मोठे धक्के बसले. त्यामुळे २०२१ साठी नव्यानं लिलाव होण्याचीही चर्चा सुरू होती. तसेच पुढील वर्षी दोन नवीन संघही मैदानावर उतरणार असल्याची चर्चा आहे.

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. त्यामध्ये हा मोठा निर्यण घेण्यात आला आहे. पण, २०२१ च्या नव्हे, तर २०२२ च्या आयपीएलमध्ये दहा संघ एकमेकांशी भिडताना पाहायला मिळतील. आयपीएलमध्ये दोन नव्या संघांसाठी अदानी ग्रुप आणि गोएंका हे शर्यतीत आहेत.

अदानी ग्रुप व संजीव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे.

संजिव गोएंका ग्रुपनं २०१६ व २०१७ च्या आयपीएलमध्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता आणि त्या संघाला अनुक्रमे सातव्या व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.  २०२२च्या आयपीएलमध्ये दोन नव्या संघांच्या समावेशावर सर्व सदस्यांनी सकारात्मकता दर्शवली.

Leave A Reply

Your email address will not be published.