वेश्या व्यवसाय : त्रिवेणी लॉजवर छापा; एकास अटक

0

पिंपरी : बालेवाडी येथील त्रिवेणी लॉज येथे पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफार्स करण्यात आला. महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 3) दुपारी साडेपाच वाजता करण्यात आली.

 

विजय साहेबराव थोरात (31, रा. बालेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. तर राज उर्फ भागवत गुंडरे, निलेश मारवाडी उर्फ राजू, युसूफ सरदार शेख उर्फ लंगडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार थोपटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी संगणमत करून चार पिडीत महिलांना पैशाचे आमिष दाखवले. त्यांना वेश्‍या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्‍या व्यवसाय करून घेतला. तसेच त्यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका चालवली. याबाबात माहिती मिळाली असता पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली. त्यात चार महिलांची सुटका करत घटनास्थळावरून 39 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.