‘स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पोलिसांचा छापा, चार महिलांची सुटका

0

पिंपरी : शहरात मसाज सेंटर (स्पा) चे पीक वाढत आहे. ठराविक स्पा सेंटर सोडता अनेक ठिकाणी गैरप्रकार सुरु आहेत. अनेक स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. मोशी, प्राधिकरण येथील अश्याच एका स्पा वर कारवाई करुन पोलिसांनी चार महिलांची सुटका केली आहे. तर एका महिलेस अटक केली असून मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रिव्हिया बिझनेस सेंटर येथील क्रोवेन नावाच्या स्पा मध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पथकाने बनावट गिऱ्हाईक पाठवून सर्व भांडाफोड केला.

पोलिसांनी स्पा चालक, मालक अजय अरुण वाळके (32, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे. तर व्यवस्थापक महिलेला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.