स्पा सेंटरच्या नावाखालीवेश्या व्यवसाय; सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचा छापा ; 7 तरुणींची सुटका

0

पिंपरी : मुलींकडुन  जबरदस्ती वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या एका स्पा सेंटरवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने सोमवार (ता.24) रोजी छापा टाकला.

या छाप्यामध्ये परदेशातील 05 आणि राज्यातील 02 अशा 07 मुलींकडुन मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इलेमेंट दि फॅमिली स्पा या सेंटर वर पथकाने हि कारवाई केली आहे.

स्पा सेंटर मालक शुभांकर महेश जवाजीराव (27 वर्ष, रा. 512, जुना बाजार, खडकी) आणि मॅनेजर  रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे (वय-43 वर्ष, रा. काळेवाडी फाटा, शिवरत्न हॉस्पिटल जवळ, वाकड, मुळगाव – धरणगाव, ता. एरंडोल, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मसाज सेंटरच्या नावाखाली मुलींकडुन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात आहे. तसेच स्पा मालक व मॅनेजर प्रती ग्राहक 02 हजार 500 घेत आहेत. आणि मुलींना केवळ 500 रुपये देत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे बोगस ग्राहक स्पा सेंटर मध्ये पाठविण्यात आले आणि सापळा रचुन स्पा सेंटर वर सायंकाळी छापा टाकण्यात आला. या छाप्यात 07 मुलींची सुटका करण्यात आली असुन त्यांची रवानगी हडपसर येथील सुधारगृहात करण्यात आली आहे. या मुली पैकी 05 मुली या सिक्किम, पश्चिम बंगाल, नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यातील आहेत तर 02 मुली या राज्यातील आहेत.

स्पा सेंटर मधुन 09 हजार 900 रुपयांची रोख रक्कम, 05 हजाराचा मोबाईल फोन, 20 रुपयांचे इतर साहित्य असा एकुण 14 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाने आरोपींना गुरुवार  (ता.27) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, उप-निरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, उप-निरीक्षक धैर्यशील सोळंके, हवालदार किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, स्वप्निल खेतले, भगवंता मुठे, अमोल साडेकर, पोलीस नाईक गणेश कारोटे, मारुती करचुंडे, अमोल शिंदे, दिपक शिरसाट, पोलीस शिपाई अतुल लोखंडे, सुमित ढमाळ, महिला पोलीस नाईक संगिता जाधव, महिला पोलीस शिपाई सोनाली माने यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.