पिंपरी : भोसरी येथे एका स्पा सेंटरवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. त्यात दोन महिलांची सुटका केली असून एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मंगळवारी (दि. 19) सायंकाळी पावणे सात वाजता जुना पुणे मुंबई महामार्गावर नाशिक फाट्याजवळ असलेल्या व्हीआयपी स्पा अँड ब्युटी येथे करण्यात आली.
सीमा चरणदास शिंदे (35, रा. बिबवेवाडी, मार्केटयार्ड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाट्याजवळ सागर कॉर्नर या बिल्डिंगमध्ये व्हीआयपी स्पा अँड ब्युटी या सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने या स्पा सेंटरवर छापा मारला.
त्यात मॅनेजर असलेल्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली आहे. कारवाईमध्ये 12 हजार 720 रुपयांची रोकड, 19 हजारांचे तीन मोबाईल फोन आणि 34 रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 31 हजार 755 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, सहाय्यक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, अंमलदार संदीप गवारी, अनंत यादव, सुनील शिरसाठ, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, महेश बारकुले, दीपक साबळे, विष्णू भारती, अमोल शिंदे, अनिल महाजन, नामदेव राठोड, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, योगेश तिडके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने, योगिनी कचरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.