वेब सीरिजच्या नावाखाली देहविक्री; पोलिसांनी केला पर्दाफाश

0

मुंबई : वेब सीरिजच्या नावाखाली देहविक्री सुरु असलेल्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड मारत देहविक्रीचा पर्दाफाश केला. यामध्ये तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामध्ये दोन मॉडेल्सचा समावेश आहे.

वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यावर पोलिसांनी सापळा रचला. अटक करण्यात आलेली महिला ही वेब सीरिजमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे तसेच ब्युटीशियन सुद्धा आहे.

मुंबई पोलिसांना या देहविक्रीची माहिती मिळाल्यावर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर हा ग्राहक घटनास्थळावर पोहोचल्यावर देहविक्री चालवणाऱ्या महिलेने मुलींना बोलावले.

त्याचवेळी पोलिसांनी धाड टाकत देहविक्रीचा पर्दाफाश केला. शहरात गेल्या काही दिवसांपुर्वी सुद्धा असाच प्रकार समोर आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.