‘स्पा सेंटर’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; मालकास अटक

0

पिंपरी : ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या ठिकाणावर पोलिसांनी छापा टाकून मालकाला अटक केली. तर तीन मुलींची सुटका केली आहे.

तानाजी उर्फ राजेश व्यकंट कानुरे (32, रा. रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्या मालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी अजिंठानगर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवत होता. याबाबत निगडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी स्पा सेंटरवर छापा टाकून मालकाला अटक केली व तीन पिडित मुलींची केली.

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र घनवट, पोलीस हवालदार सतीश ढोले, पोलीस हवालदार परवीन पठाण, पोलीस शिपाई विनोद व्हनमाने, सोपान बोदवड, दीपक जाधव यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.