विरोधकांना काही काम नाही, ते जाणीवपूर्वक टीका करतात ः अजित पवार 

0

मुंबई ः “मागील आठवड्यातच औरंगाबाद नामांतराविषयी बोललो होती. तिघांचे सरकार असताना काही विषय कधी निघू शकतात. यावर एकत्र बसून चर्चा करून योग्य पद्धत्तीचा मार्ग काढू. त्यासंदर्भात आज आमची बैठक आहे. या प्रकरणाता नेमकं काय झालं आहे. जाणीवपूर्वक काही गडबड केली आहे का, याही बाबी तपासल्या जातील. कधी-कधी अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. यामागचे नेमकं कारण पाहून शहानिशा करूनच यावर वक्तव्य करेन”, असा प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

विरोधी पक्षावर टीका करताना अजित पवार म्हणाले की, “विरोधकांना जाणीवपूर्वक अशी टीका करण्याची असते. त्यांना काम नाही. मुद्रांक शुल्काबाबत निर्णय घेतला तेव्हा त्यांनी टीका केली. परंतु, या निर्णयानंतर जे खरेदीविक्रीचे व्यवहार झाले, ते यापूर्वी कधीच झाले नव्हते. याचा सर्वांना फायदा झाला”, अशी टीका विरोधकांवर अजित पवारांनी केली.

अजित पवार पुढे म्हणाले की, “ग्राहकांना शून्य टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात आले. ३ टक्के आम्ही सोसले आणि २ टक्के बिल्डरांनी सोसले. सदनिका घेणाऱ्यांतादेखील ५ टक्के फायदा झाला. प्रीमियम निर्ण. घेतानाही ग्राहकहित लक्षात घेतले पाहिजे. एसआरते अनेक प्रकल्प ठप्प आहेत”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.