महाविकास आघाडीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये निदर्शने

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटिशीची केली होळी

0

पिंपरी : “देवेंद्रजी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडी सरकारच करायचं काय, खाली डोकं वर पाय… वंदे मातरम्… अशा घोषणांनी भाजपा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारचा रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार निषेध केला.
‘फोन टॅपिंग’ प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांनी चौकशी सुरू केल्याच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. फडणवीसांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीची यावेळी होळी करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात महाविकास आघाडीच निषेध व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी होणार आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीस यांना सायबर गुन्हे शाखेने नोटीस बजावली होती. याविरोधात भाजपने प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांनी चौकशी सुरू केल्याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत महा विकास आघाडीच्या कारभाराचा निषेध केला.
यावेळी महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस  राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, महिला शहर अध्यक्ष उज्वला गावडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, शहर उपाध्यक्ष दत्ता गव्हाणे, वीणा सोनवलकर, युवा शहर अध्यक्ष संकेत चोंधे, संजय पटनी, हेमंत देवकुळे, संजय परळीकर, किरण पाटील, विशाल वाळुंजकर, आशा काळे, उद्योग आघाडी अध्यक्ष निखिल काळकुटे, रवी नांदूरकर, कायदा आघाडी अध्यक्ष देवदास शिंदे, व्यापारी आघाडी सरचिटणीस सतपाल गोयल, पोपट हजारे, अतुल इनामदार, प्रदीप बेंद्रे, दत्ता यादव, मुकेश चुडासमा, मनोज ब्राम्हणकर, मुक्ता गोसावी, कविता करदास,  मधुकर बच्चे अर्जुन ठाकरे, शिवराज लांडगे, धाडगे, कैलास सानप, धर्मेंद्र क्षीरसागर, पांडुरंग दातीर, गिरीश देशमुख, आदित्य कुलकर्णी, मनोज तोरडमल, योगेश एकुलवार, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

नोटीस देण्याची चूक सरकारला भोवणार  : नामदेव ढाके
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, भ्रष्ट महाविकास आघाडी सरकार आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी धडपडत आहे. मात्र त्यांनी चुकीच्या व्यक्ती संदर्भात पंगा घेतला आहे. देवेंद्रजी फडणवीस भाजप सरकार मधील अतिशय अभ्यासू आणि विश्वासू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या चौकशीच्या निमित्ताने महाविकासआघाडीने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. फडणवीस यांना नोटीस दिल्यानंतर भाजपचे काय  महाराष्ट्रातील सत्याला मानणारे अनेक कार्यकर्ते नागरिक यांच्यामध्ये संताप निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही चूक महाविकासआघाडी भोवल्याशिवाय राहणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.