केंद्र सरकारच्या नविन कृषी विधेयकांविरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ देण्यासाठी साई चौक पाषाण येथे गेल्या २३ दिवसांपासून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने उपशहर संघटक आशुतोष आमले व शिवसैनिकांचे साई चौक पाषाण येथे रस्त्यावर तंबु ठोकुन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
यामधे शाखाप्रमुख सुनिल राजगुरू, अजिंक्य सुतार, भरत दहिभाते, विक्रांत भोसले, संदीप सातव, उपशाखाप्रमुख पवन खराबे सहभागी झाले आहेत. ज्या प्रकारे शिवसैनिक रात्रंदिवस उन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता चिकाटीने आंदोलनावर ठाम आहेत. याने प्रेरीत होऊन पाषाण येथील सामाजिक कार्यकर्ते अजय भगवान निम्हण, विजय भगवान निम्हण यांच्या सह अनेक समर्थकांनी काल संपर्क प्रमुख व शहरप्रमुखांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
संपर्कप्रमुख बाळाभाई कदम यांनी शिवसेना खंबीर पणे सर्वांच्या पाठिशी असुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ८० टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण या शिकवणी नुसार भागातील जनतेच्या कामांवर भर देऊन कामाला लागा असे सांगितले, शहरप्रमुख संजय मोरे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख उल्हासदादा शेवाळे,पुणे महानगरपालिकेचे शिवसेना माजी गटनेते अशोक हरणावळ,बाळासाहेब ओसवाल,आनंद दवे,श्रीकांत पुजारी, आशुतोष आमले,दिलिप पोमण,सुनिल राजगुरू,अनिल राजगुरू आदी उपस्थित होते.