पुनावळे कचरा डेपो रद्द करणार; मंत्री उदय सामंत यांची अधिवेशात ग्वाही

पुनावळेकरांमध्ये जल्लोष; पेढे भरविले, फटाके फोडले

0

नागपूरपिंपरीचिंचवड महापालिकेच्या प्रस्तावित कचरा डेपोविरोधात पुनावळेकरांनी एकजूट केली आणि प्रशासनाला विरोध केलाया लढाईत सर्वपक्षीय नेत्यांनी सकारात्मक साथ दिलीत्याला यश मिळाले असूनराज्य शासनाच्या वतीने सदर कचरा डेपो प्रकल्प रद्दकरण्याची ग्वाही देण्यात आली आहेयानंतर पुनावळे ग्रामस्थ आणि सोसायटीधारक यांनी आनंदोस्तव साजरा केलाएकमेकांना पेढेभरवूनफटाके फोडून जल्लोष केला

चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदार अश्विनी जगताप यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारचे या प्रश्नाकडेलक्ष वेधलेत्याला कॅबिनेटमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘‘प्रकल्प रद्द करण्याचे आदेश त्वरित देणार’’ अशी ग्वाहीमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पिंपरीचिंचवड सोसायटी हाउसिंग फेडरेशनसमस्त पुनावळेकरआमदार अश्विनी जगतापनवनाथ ढवळेसंदीप पवारचेतनभुजबळसचिन लोंढेराहुल काटेअमित काटेसागर लेंडवे यांच्या गेल्या  महिन्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

‘‘ मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असतानानव्या कचरा डेपोची खरंच आवश्यकता आहे का?’’ याचा अभ्यास करुननिर्णय घेतला जाईलआम्ही पुनावळेकरांसोबत आहोतअशी भूमिका भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी घेतली होतीतसेचराष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनीही पुनावळे कचरा डेपोविरोधात साखळी उपोषण करीत प्रशासनाचे लक्षवेधले होतेसर्वपक्षीय स्थानिक नेते आणि पुनावळेतील सदनिकाधारकांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांना राज्य सरकारचा सकारात्मकप्रतिसाद मिळाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

सभागृहात बोलताना आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की,  पुनावळे येथील २६ हेक्टर जागा २००८ साली कचरा डेपोसाठी आरक्षीतकरण्यात आलीगेल्या १५ वर्षांत या भागात सुमारे  लाख नागरिक वास्तव्यास आहेतया प्रकल्पाला केंद्र शासनाची तत्त्वतमान्यतादिली आहेकेंद्राच्या निर्देशानुसार  वर्षांच्या आत आरक्षणाची पूर्तता  झाल्यास आरक्षण रद्द केले जातेतरीही महापालिकाप्रशासनाने १५ वर्षांनंतर हा प्रकल्प हाती घेण्याबाबत कार्यवाही सुरू केलीप्रकल्प अहवालानुसार विहीत वेळेत अटीशर्तींची पूर्तताकेली नाहीकेंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिलेली नाहीयाबाबत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.

कॅबिनेट मंत्री उदय सामंत म्हणाले कीघनकचरा व्यवस्थापनासाठी २६ हेक्टर जागा अपेक्षीत होतीत्यासाठी वन खात्याने पर्यायी जागामागितली होतीत्यानंतर मुळशी आणि चंद्रपूर येथील जागा दाखवण्यात आलीचंद्रपूरची जागाही वनखात्याने नाकारली आहेकेंद्रसरकारच्या निर्देशानुसारघनकचरा व्यवस्थापन प्रकल्प करताना स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होईलअशी भूमिका घेता येणारनाहीपुनावळेतील सदर घनकचरा प्रकल्प रद्द केला जाईलत्यासाठी पर्यायी जागा शोधली जाईल.

मागील आठवड्यात मी मंत्री उदय सामंत यांना भेटून पुनावळे कचरा डेपो का नसावा याची माहिती दिलीयावर त्यांनी सकारत्मक निर्णयघेतला यामुळे शहरवासियांमध्ये आंनदाचे वातावरण आहेखास करून नगरविकास खात्याचे आभार या परिसराचे माजी नगरसेवकराहुल कलाटे यांनी मानले.

चौकट : 

मागील वीस वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याला आज यश आलेपुनावळे ग्रामस्थांना न्याय मिळालाआमदार अस्विनी जगताप यांनीअधिवेशात बाजू ठाम मांडल्याने आज हा कचरा डेपो रद्द झालाभाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनीही योग्य दिशा दिल्याने हे शक्यझालेपुनावळे ग्रामस्थ आणि सोसायटी धारकांनी पाठिंबा दिल्याने शक्य झालेसर्वांचे आभार.

नवनाथ ढवळे

युवा नेतेपुनावळे

Leave A Reply

Your email address will not be published.