पुण्यातील ‘आयटी इंजिनियर’ पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात

0

पिंपरी : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ओडिशा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) पुण्यातून एका संगणक अभियंता तरुणाला अटक केली. संगणक अभियंता तरुण मूळचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील विहे गावातील आहे. त्याने गावात नवीन दुमजली बंगला बांधला आहे. तो पुण्यातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होता. अभिजित संजय जांबुरे असे पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला जांबुरेने गोपनीय तांत्रिक माहिती, सांकेतिक शब्द (ओटीपी) पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ओडिशा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून ओडिशा पोलिसांचे पथक भुवनेश्वरला रवाना झाले आहे.

जांबुरे गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातील पदवीधर आहे. त्याने सांख्यिकी विषयातील पदवी मिळवली आहे. तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील २ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. जांबुरेने तयार केलेल्या ओटीपींची विक्री त्याने सायबर गुन्हेगारांना केल्याचा संशय आहे. पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांना त्याने समाजमाध्यमातील संदेश सुविधेद्वारे (मेसेंजर) ओटीपी दिले होते. तो समाजमाध्यमातील संपर्क सुविधेद्वारे काही पाकिस्तानी आणि नायजेरियन नागरिकांच्या संपर्कात असल्याचे ओडिशा एसटीएफने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर व त्यांच्या पथकाने विहेतील अभिजितच्या घरी जाऊन माहिती घेतली. आम्हाला वरिष्ठांकडून अद्याप चौकशीचे आदेश नाहीत. तो विहेतील असल्याचे समजल्याने येथे जाऊन माहिती घेतली घेतली, असे भापकर म्हणाले.

आरोपी ॲक्टिव्हेट न झालेल्या सिमकार्डची दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करून खरेदी करायचे. ओटीपी तयार करून डिजिटल वाॅलेटला एक ते ३० हजार रुपयांना तो विक्री करत होता. आरोपींनी अशा पद्धतीने हजारो ओटीपी सायबर गुन्हेगारांना पुरवल्याचा संशय विशेष तपास पथकाने व्यक्त केला आहे. पाकितानमधील दानिशला मिळणारी रक्कम तो अभिजितच्या भारतातील खात्यात जमा करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्यांची खातेही शोधली आहे.

आरोपी अभिजित जांबुरे २०१८ पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होता. तो समाजमाध्यमातील संदेश यंत्रणेद्वारे फैसलाबाद खानकी येथील दानिश अलिस सय्यद दानिस अली नक्वी याच्या संपर्कात होता. दानिशने अभिजितला अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत (फ्री लान्सर) असल्याची बतावणी केली होती. अभिजितने त्याचा ई-मेल आणि सांकेतिक शब्द दानिशला दिला होता. दानिश अभिजितच्या सल्ल्यानुसार माहिती-तंज्ञत्रान कंपनीत काम करत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.