पुन्हा एकदा आलिया आणि रणवीर एकत्र दिसणार

0

मुंबई ः ‘गली बाॅय’नंतर पुन्हा एकदा रणवीर सिंग आणि आलिया भट मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेता रणवीर सिंग आलिया भटसोबत काम करतना दिसणार आहे. या दोघांना एकत्र करण्याचे काम प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने केले आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला एप्रिल २०२१ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती कळलेली आहे.

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार रणवीर सिंग सर्व प्रोजेक्ट संपवून या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार आहे. शुटिंग सुरु होण्याअगोदर २५ दिवसांचा एक वर्कशाॅप रणवीर व आलिया अटेंड करणार आहे.

आलिया भट ही संजय लिला भन्साळींच्या आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठीयावाडी’चे शुटिंग पूर्ण करून या चित्रपटाच्या कामाला लागणार आहे. चाहत्यांना दोघांची जोडी पुन्हा पडद्यावर पाहयला मिळणार आहे. त्याचबरोबर रणवीर सिंग रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.