मजुराच्या मृत्यूस दोषी ठरवत ठेकेदाराला शिक्षा

मजुरीचे पैसे मागितले म्हणून केली होती रॉडने मारहाण

0

पुणे : मजुरीचे पैसे मागण्यासाठी आलेल्या मजुराला रॉडने मारहाण करीत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदाराला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी आहे. सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला.

महादेव नाना सावळे असे शिक्षा झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात रमेश ज्ञानेश्‍वर गालफाडे या मजुराचा मृत्यू झाला होता. पिंपरीतील रमाबार्इनगर कमानीजवळील रस्त्यावर एक ऑक्टोंबर २०१४ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या प्रकरणी रमेश यांचा भाऊ दिलीप सावळे (वय ३१, रा. रमाबार्इनगर झोपटपट्टी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. महादेव आणि त्याचे वडील नाना यमाजी सावळे हे रंगकामाचे ठेके घेत. घटनेच्या एक आठवडा आधी रमेश हे महादेव याच्याकडे रंगकामासाठी रोजाने कामाला गेले होते. तर मारहाण करण्याचा आदल्या दिवशी रमेश हे ठेकेदाराकडे मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना ठेकेदारांनी शिवीगाळ करून हाकलून दिले होते.

आपसांत समझोता झाल्याने सुरुवातील रमेश यांच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिली नव्हती. हल्ल्याच्या दिवशी रात्री रमेश यांच्या पोटात जास्त त्रास होवू लाघण्याने त्यांना पिंपरीयेथील वायसीएममध्ये दाखल करण्यात आले होते. दुसर-या दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दिलीप सावळे यांनी तक्रार दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.