प्रेमात पडल्यामुळे एखाद्याला शिक्षा देणं गंभीर गुन्हा ः सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली ः एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यामुळे किंवा एकमेकांचा सहवास लाभण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल त्यांना शिक्षा देणं हा कायद्यानं गुन्हा आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. “तुम्ही एखाद्याला प्रेमात पाडल्याबद्दल शिक्षा करू शकत नाही. तशी शिक्षा केल्यास तो गंभीर स्वरुपाचा गुन्हा होईल”, असेही मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ३ सदस्यीय घटनापीठासमोर एका गावातील खाप पंचायतीमधील ११ सदस्यांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत हे मत मांडण्यात आले. घटना अशी होती की, उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यात १९९१ साली ही घटना घडली होती. एका गावातील एक दलित तरूण तरुणीसोबत पळून गेला होता. त्याला त्याच्या चुलत भावाने मदत केली होती. म्हणून त्या तिघांना फाशी देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार या पंचायतील सदस्यांनी केला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायाधिशांनी झापलं.
या घटनेत ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील ८ जणांना अलहाबाद कोर्टाने २०१६ ला फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच इतरांना आजीवन तुरुंगवासाची शिक्षा दिलेली होती.
Leave A Reply

Your email address will not be published.