अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-यासह त्याचा मित्राला सक्तमजुरीची शिक्षा

0

पुणे  : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २४ वर्षीय तरूणासह त्याच्या २० वर्षीय मित्राला न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विशेष पॉक्सो न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.

श्रीमंत शांतय्या स्वामी (वय २४) याला पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तर त्याचा मित्र शंकर ऊर्फ शिवशंकर सिधय्या स्वामी (वय २०, दोघेही रा. चिखली) यास तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडची शिक्षा ठोठावण्यात आली.

ही घटना १३ मे २०१९ रोजी चिखली परिसरात घडली. आरोपी हे पिडीतेच्या घरासमोरील चाळीत राहत होते. घटनेच्या दिवशी संबंधित मुलगी ही श्रीमंत यास भेटण्यास गेली असता त्याने तिला घरात बोलाविले. यावेळी त्याठिकाणी असलेला त्याचा मित्र शिवशंकर हा घराबाहेर निघूल गेला. जातेवेळी त्याने घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर श्रीमंत याने आपण दोघे लग्न करूयात असे म्हणत विनयभंग केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी पाहिले. गुन्हा शाबीत करण्यासाठी त्यांनी चार साक्षीदार तपासले. या करणाचा तपास यु. बी. ओमासे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस निलेश दरेकर यांनी सहकार्य केले. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.